पांडुरंगाची कलात्मक ११ फुट रांगोळी साकारली; पारनेरच्या चित्रकार वैजयंती अडसूळ यांची अनोखी कलाकृती पारनेर प्रतिनिधी : “आषाढी एकादशी" म्...
पांडुरंगाची कलात्मक ११ फुट रांगोळी साकारली; पारनेरच्या चित्रकार वैजयंती अडसूळ यांची अनोखी कलाकृती
पारनेर प्रतिनिधी :
“आषाढी एकादशी" म्हटलं की, असंख्य वारकरी आपल्या विठ्ठलाचा नामघोष करीत श्री पांडुरंगाच्या दर्शनाला पायी पंढरीला जायला निघतात. संपूर्ण वारी विठ्ठलमय होऊन जाते. “ठायी ठायी विठ्ठल! ठायी ठायी पंढरी” या पंक्तीप्रमाणे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चित्रकार वैजयंती अडसूळ यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री पांडुरंगाची ११ फूट एवढी मोठी रांगोळी घरी साकारली आहे.
अतिशय कलात्मक पद्धतीने व सुंदर रेखीव अशी रांगोळी त्यांनी आपल्या घरी साकारली मूळच्या हिवरे कोरडा येथील असलेल्या वैजयंती अडसूळ या एक उत्तम कलाकार आहेत. त्यांनी अशा स्वरूपाच्या विविध कलात्मक रांगोळ्या आजपर्यंत साकारल्या आहेत.
ही पांडुरंगाची रांगोळी साकारायला त्यांना तीन तासांचा अवधी लागला. अडसूळ यांची ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे.
ही रांगोळी / कलाकृती वारकरी व पंढरीच्या वारीला समर्पित करीत आहे, असे वैजयंती अडसूळ म्हणाल्या पांडुरंगाची निस्सिम भक्ती या ११ फूट रांगोळीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, असेही ते म्हणाले, असे सुंदर, मनमोहक विठ्ठलाचे सुमुख दर्शविणाऱ्या रांगोळीच्या त्यांनी विविध चित्रफिती काढल्या आहेत. यावेळी वैजयंती अडसूळ यांच्या कलागुणांचे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी अभिनंदन केले व त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले.
COMMENTS