वासुंद्यात विखेंच्या मंत्रिपदाचे झावरे पाटील गटाने केले जोरदार स्वागत विखेंच्या माध्यमातून झावरे देणार तालुक्याच्या विकासाला गती : जालिंदर व...
वासुंद्यात विखेंच्या मंत्रिपदाचे झावरे पाटील गटाने केले जोरदार स्वागत
विखेंच्या माध्यमातून झावरे देणार तालुक्याच्या विकासाला गती : जालिंदर वाबळे
पारनेर/प्रतिनिधी :
शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात व पारनेर तालुक्यात त्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील वासुंदे, भाळवणी, पारनेर, निघोज या ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. विखे पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे कार्यकर्त्यांनी तालुक्यात एकच जल्लोष केला आहे.
दरम्यान वासुंदे येथे सुजित झावरे पाटील समर्थकांनी विखे पाटलांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर फटाके फोडत पेढे वाटत जोरदार आनंद साजरा केला.
यावेळी झावरे पाटील समर्थक जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली ही खऱ्या अर्थाने अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. पारनेर तालुक्याचे नेते सुजितराव झावरे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या पुढील काळात पारनेर तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी आणतील आणि तालुक्याला एका वेगळ्या विकासाच्या उंचीवर घेऊन जातील राधाकृष्ण विखे हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करतात त्यांच्या माध्यमातून नक्कीच यापुढील काळात पारनेर तालुक्याच्या विकासाला गती मिळेल.
विखेंना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी वासुंदे येथे जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, वासुंदे सेवा सोसायटीचे संचालक दिलीपराव उदावंत, सेवा सोसायटीचे तज्ञ संचालक बाळासाहेब पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन दिलीपराव पाटोळे, मा. व्हा. चेअरमन खंडू टोपले, बाळासाहेब झावरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण झावरे, शरद सैद, सुदामराव भालके, तबाजी टोपले, ठकाजी चेमटे, राजेंद्र शिंदे, बापूसाहेब बर्वे, पोपटराव हिंगडे, पांडुरंग झावरे, भास्कर दाते, दत्तात्रय गांगड, बाळासाहेब साळुंके, दादाभाऊ चेमटे, शिवाजी हिंगडे, सुदाम झावरे, शिवाजी बर्वे, अंकुश बर्वे, रावसाहेब झावरे, भिमाजी दाते, साहेबराव हिंगडे, सुभाष शिंदे, भाऊसाहेब जगदाळे, संपत झावरे, सुभाष चौगुले, काशिनाथ बर्वे, सावंत दाजी आदी वासुंदे येथील ग्रामस्थ सुजित झावरे पाटील गटाचे कार्यकर्ते, देवकृपा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विखे समर्थक उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि पारनेर तालुक्यात झावरे पाटील समर्थकांमध्ये खऱ्या अर्थाने उत्साह संचारला आहे. सुजितराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पुढील काळात पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मंत्री राधाकृष्ण विखे साहेबांच्या माध्यमातून भरीव निधी आणून तालुक्याला विकासाच्या बाबतीत पारनेर तालुक्याचे नेते सुजितराव झावरे वेगळ्या उंचीवर घेऊन जातील.
बाळासाहेब पाटील
(तज्ञ संचालक सेवा सोसायटी, वासुंदे)