🎯मंत्री राधाकृष्ण विखेंचा पारनेर तालुक्यातील समर्थकांकडून सन्मान 🎯कॅबिनेट मंत्रीपदी निवड होताच आनंद उत्सव साजरा करत मुंबई येथे केला सत्कार...
🎯मंत्री राधाकृष्ण विखेंचा पारनेर तालुक्यातील समर्थकांकडून सन्मान
🎯कॅबिनेट मंत्रीपदी निवड होताच आनंद उत्सव साजरा करत मुंबई येथे केला सत्कार
🎯विखे साहेबांच्या माध्यमातून यापुढील काळातही विकासासाठी कटिबद्धच : राहुल शिंदे पाटील
🎯विखे कॅबिनेट मंत्रीपदी निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली नवचेतना
पारनेर प्रतिनिधी :
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहमदनगर जिल्ह्याला प्रथम स्थान मिळाले यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात एकच जल्लोष केला. पारनेर तालुक्यातील समर्थक कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत मुंबई या ठिकाणी जात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मान व सत्कार केला. यावेळी पारनेर तालुक्याचे युवा नेते राहुल पाटील शिंदे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्यानंतर भेट घेत त्यांचा सन्मान केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना राहुल पाटील शिंदे म्हणाले की या पुढील काळात तालुक्यात व सुपा परिसरामध्ये काम करत असताना पारनेर तालुक्यावर ज्यांचे विशेष प्रेम आहे असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कॅबिनेट मंत्री पदाच्या माध्यमातून विकासात्मक काम करून खऱ्या अर्थाने परिसराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे तारणहार असून जनतेच्या प्रश्नांची त्यांना पूर्णतः जाण आहे यापुढील काळात काम करत असताना ते सर्वसामान्य जनतेला न्याय देतील त्यांच्या माध्यमातून काम करत असताना पारनेर तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी तत्पर राहू व विकासात्मक काम करून तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू
दरम्यान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना, जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा शिंदे पाटील, टाकळी ढोकेश्वर गावचे माजी सरपंच शिवाजी काका खिलारी, सुपा गावचे उपसरपंच दत्ता नाना पवार, राळेगण थरपाचे सरपंच पंकज दादा कारखिले, कडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे, रांजणगावचे सरपंच बंटी साबळे, तुषार पवार आदी उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेते नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांची शिंदे फडणवीस सरकारमध्ये क्रांतीदिनी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. हा खऱ्या अर्थाने विखे समर्थकांसाठी आनंदाचा क्षण आहे. पारनेर तालुक्यातील सर्व विखे गटाच्या वतीने मी त्यांचे निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करतो.
शिवाजी खिलारी पाटील
(माजी सरपंच, टाकळी ढोकेश्वर, पारनेर)