कु. पल्लवी थोरात हिची एम. एस. साठी कॅलिफोर्निया विद्यापीठात निवड पारनेर प्रतिनिधी : करंदी ता.पारनेर येथील कु. पल्लवी अशोक थोरात ह्या विद्या...
कु. पल्लवी थोरात हिची एम. एस. साठी कॅलिफोर्निया विद्यापीठात निवड
पारनेर प्रतिनिधी :
करंदी ता.पारनेर येथील कु. पल्लवी अशोक थोरात ह्या विद्यार्थीनीची अमेरिकेतील कॉलेफोर्निया युनिव्हर्सिटी फ्लुटरॉन येथे एम.एस. साठी निवड झाली आहे.
पल्लवी हिचे मुळगाव करंदी असुन तनपुरेवाडी, निघोज येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत इयत्ता १ली ते ४थी पर्यंतचे शिक्षण झालेले असुन ५वी ते १२वीचे माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरुर येथे पुर्ण केलेले आहे.
त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सिंहगड कॉलेज वडगाव येथे झाले आहे. तिने ३४० मार्कांच्या असणा-या जी.आर.ई. परीक्षेत ३२८ तर टोफेल परीक्षेत १२० पैकी १०० मार्क्स मिळविल्याने कॉलेफोर्निया युनिव्हर्सिटी फ्लुटरॉन या अमेरीकेतील युनिव्हर्सिटीमध्ये एम.एस.साठी निवड झाली आहे.
पल्लवीचे वडील व्यवसायाने शिक्षक असुन आई गृहीणी आहेत. तिने मिळविलेल्या यशाचे व तिचे आई वडील व शिक्षक परीसरात कौतुक होत आहे. जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनीही कु. पल्लवी थोरात हिचे कौतुक केले आहे व तिच्या निवडीबद्दल तिला शुभेच्छा दिल्या.