देवकृपाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर मनमाड रस्त्यावरील वाहतूक केली सुरळीत तीन तास झाली होती सलग वाहतूक कोंडी राहुरी प्रतिनिधी : नगर मनमाड रस्त्या...
देवकृपाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर मनमाड रस्त्यावरील वाहतूक केली सुरळीत
तीन तास झाली होती सलग वाहतूक कोंडी
राहुरी प्रतिनिधी :
नगर मनमाड रस्त्यावरील राहुरीच्या पुढे देवळाली प्रवरा चौकामध्ये शनिवारी दुपारी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. सलग तीन तास झालेल्या वाहतूकुंडीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. प्रवाशांची निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेता शिर्डी व लोणी प्रवरा या ठिकाणी जात असताना पारनेर तालुक्याचे नेते सुजितराव झावरे पाटील यांचे सहकारी व देवकृपा फाउंडेशन पदाधिकारी यांनी जवळजवळ एक तास रस्त्यावर उभे राहत नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील देवळाली प्रवारा चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत केली.
यावेळी पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोन्याबापू भापकर, जवळा येथील युवा नेते अमोल रासकर, कैलास नऱ्हे अशोकराव मेसे, रवींद्रशेठ पाडळकर किसनराव धुमाळ साहेबराव नरसाळे, शंकर महांडुळे सचिन शेळके राहुल ठोकळ, शिवाजीराव खोडदे, या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विशेष मेहनत घेत रस्ता सुरळीत केला त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबली. त्यामुळे देवकृपा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे राहुरी येथील ग्रामस्थांनी कौतुक केले.
..