कलाशिक्षक संतोष क्षीरसागर यांना राज्यस्तरीय गुरूगौरव शिक्षक पुरस्कार पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण ...
कलाशिक्षक संतोष क्षीरसागर यांना राज्यस्तरीय गुरूगौरव शिक्षक पुरस्कार
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेतील न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष क्षीरसागर यांना
मंगळवार दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुरूगौरव पुरस्कार पुणे याठिकाणी प्रदान करण्यात आला या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार,कवी, विचारवंत व्याख्याते असलेले ह. भ. प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर आणि इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे. सानिपीना राव शिक्षणतज्ज्ञ मनिषा कदम, प्रकाश सावंत, यावेळी उपस्थित होते.
दरम्यान वासुंदे येथील असलेले संतोष क्षीरसागर हे हाडाचे कलाशिक्षक आहेत त्यांचे अतिशय सुंदर असे हस्तरअक्षर असून त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिली आहे. क्षीरसागर हे फलक लेखन ही उत्कृष्टरित्या करतात. संतोष शिरसागर सर यांची समाजामध्ये खऱ्या अर्थाने कलात्मक शिक्षक म्हणून ओळख आहे अशा या व्यक्तिमत्त्वाच्या कलेचा आदर खऱ्या अर्थाने मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने गौरव करत केला आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर
भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुजितराव झावरे पाटील तसेच संस्थेचे सचिव सुदेश झावरे पाटील, सरपंच सुमन सैद व उपसरपंच शंकर बर्वे, प्रगतिशील शेतकरी भाऊ सैद, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे यांनी यांनी अभिनंदन केले.