केंद्र सरकारकडून ईडीचा राजकीय वापर : विश्वंभर चौधरी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी चौधरींची चर्चा पारनेर प्रतिनिधी...
केंद्र सरकारकडून ईडीचा राजकीय वापर : विश्वंभर चौधरी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी चौधरींची चर्चा
पारनेर प्रतिनिधी :
राज्यातलं सरकार भ्रष्टाचारातून जन्माला आलेलं आहे म्हणून लोकायुक्त मसूदा समितीच्या सदस्यपदाचा मी राजीनामा देऊ इच्छित आहे.
केंद्र सरकारकडून ईडीचा चाललेला राजकीय वापर आणि विशेषतः राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून होत असलेलं सूडाचं राजकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व लोकायुक्त मसूदा समितीचे सदस्य विश्वंभर चौधरी यांनी दिली.
राळेगण सिद्धी (ता.पारनेर) येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची चौधरी यांनी भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर विविध चर्चा केली.
यावेळी हजारे यांनीही लोकायुक्त मसूदा शेवटच्या टप्प्यात आहे म्हणून आपण राजीनामा देऊ नये असं सांगितले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
'सकाळ' शी बोलताना चौधरी म्हणाले,
आज अण्णांची भेट घेतली. खूप अस्वस्थता आली म्हणून भेटलो. राज्यात आणि केंद्रात जे चालू आहे त्यावर चर्चा केली.राज्यात अनेक राजकीय घडामोडीं वेगाने घडत आहेत यामागे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे राज्यात मंत्रीमंडळ स्थापन न झाल्याने राज्यातील विविध प्रश्न प्रलंबित राहत आहेत या विषयांवर हजारे यांच्याशी चर्चा केली आहे.
यावेळी दादासाहेब पठारे,नाना आवारी उपस्थित होते.
वय ८५ असूनही अण्णांचा उत्साह कायम ...
जेष्ठ समाजसेवक हजारे यांचे वय ८५ असुनही त्यांचा उत्साह नेहमीप्रमाणेच वाटला राळेगणमध्ये येणार्या लोकांसाठी माहीती पट गॅलरी करण्यात आली जलसंधारण आणि ग्रामविकासाचे टप्पे नव्यानं दाखवले आहेत. वेगवेगळ्या बंधार्यांची तांत्रिक माहिती दिली आहे. एक नवी गॅलरी पण केली आहे ज्यात फक्त आंदोलनांची सचित्र गाथा आहे.