श्री. ढोकेश्वर पाणी वापर संस्थेच्या चेअरमन'पदी बाळासाहेब झावरे सुजित झावरे पाटील गटाचे एक हाती वर्चस्व कायम पारनेर/प्रतिनिधी : तालुक्या...
श्री. ढोकेश्वर पाणी वापर संस्थेच्या चेअरमन'पदी बाळासाहेब झावरे
सुजित झावरे पाटील गटाचे एक हाती वर्चस्व कायम
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, वासुंदे, तिखोल येथील महत्त्वपूर्ण असलेली श्री. ढोकेश्वर पाणीवापर संस्थेची पदाधिकारी निवड प्रक्रिया नुकतीच टाकळी ढोकेश्वर येथे संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयात पार पडली. एकूण ९ संचालक असलेल्या श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्थेची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. ही सर्व निवडणूक व पदाधिकारी निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यामध्ये जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यामुळे पुन्हा या संस्थेवर झावरे पाटील गटाचे एक हाती वर्चस्व कायम राहिले.
श्री. ढोकेश्वर पाणीवापर संस्था, टाकळी ढोकेश्वर या संस्थेवर सुजित झावरे पाटील यांचे वासुंदे येथील सहकारी व मार्गदर्शक बाळासाहेब किसन झावरे यांची 'चेअरमन'पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तालुक्याच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी सर्व संचालक मंडळ हौसाबाई शिवाजी ठाणगे, ज्ञानदेव यशवंत वाळुंज, शिवाजी चीमा ठाणगे, कोंडीभाऊ ठकाजी वाळुंज, संदीप नामदेव वाळुंज, सीताबाई रामदास वाळुंज, सुदाम किसन साळुंके, आशा दिगंबर शेळके सर्व सदस्यांचे सत्कार करून सन्मान करण्यात आले.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी बाळासाहेब झावरे यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड केल्याबद्दल काकणेवाडी, तिखोल, टाकळी ढोकेश्वर मधील सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त केले. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून या पुढील काळात काम करणार आहे. नवनिर्वाचित चेअरमन तसेच संचालक मंडळाला पूर्णतः सहकार्य करून श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी निगडित प्रश्न सोडवणार आहे.
यावेळी अरुणराव ठाणगे, पोपटराव झावरे, सरपंच गीताराम वाळुंज, भिकाजी वाळुंज, प्रदीप वाळुंज, भगवान वाळुंज, अर्जुन वाळुंज, मा.सरपंच किसन वाळुंज, संदीप वाळुंज, मा.सरपंच निवृत्ती वाळुंज, ग्रा.सदस्य जयवंत वाळुंज, बाळासाहेब पवार, बाबासाहेब वाळुंज, अंकुश वाळुंज, भास्कर वाळुंज सर, सूर्यभान वाळुंज, मधुकर झावरे, ह. भ. प. रघुनाथ वाळुंज, संतोष पवार, विष्णू वाळुंज, इंजि. बबन वाळुंज, सरपंच भाऊसाहेब सैद, चेअरमन नारायण झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, दिलिपराव पाटोळे , जालिंदर वाबळे, बाळासाहेब झावरे पाटील, गोपाळा बर्वे गुरुजी, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय बर्वे, शिवाजी बर्वे, लखन बाबा झावरे, भाऊसाहेब जगदाळे, सचिन साठे तसेच काकणेवाडी, तिखोल, टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
सुजित झावरे पाटील यांचे पाणी वापर संस्थेवर वर्चस्व कायम
श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली त्यानंतर पदाधिकारी निवड ही बिनविरोध झाल्यामुळे या सर्व संस्थेवर सुजित झावरे पाटील यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. या संस्थेवर निवडून आलेले सर्व संचालक हे सुजित झावरे पाटील यांच्या विचाराचे असल्यामुळे यापुढील काळात तिखोल येथील श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या उपसा जलसिंचन योजनेच्या अनेक प्रश्न व समस्या राज्य सरकारच्या माध्यमातून आता मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पाणी वापर संस्था सुजित झावरे गटाकडे आल्यामुळे शेतकऱ्यांमधून पुन्हा एकदा समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जलसिंचन योजना कार्यान्वित करणार : बाळासाहेब झावरे..
श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्था ही टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, वासुंदे, तिखोल येथील शेतकऱ्यांच्या हिताची असून या ठिकाणी ही योजना पुन्हा एकदा नव्याने कार्यरत करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आवर्तन मिळविण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार आहे असे नवनिर्वाचित श्री ढोकेश्वर पाणी वापर संस्थेचे चेअरमन बाळासाहेब किसन झावरे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.