टाकळी ढोकेश्वर येथे डी. एन. एस पतसंस्थेचे आज उद्घाटन पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर याठिकाणी डी. एन. एस ग्रामीण बिगरशेती सहक...
टाकळी ढोकेश्वर येथे डी. एन. एस पतसंस्थेचे आज उद्घाटन
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर याठिकाणी डी. एन. एस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा प्रारंभ होत असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन नारायण यशवंत झावरे यांनी दिली आहे. गुरूवारी दुपारी टाकळी ढोकेश्वर पोलिस स्टेशनच्या समोरील कृष्णकुंज बिल्डींग याठिकाणी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
हभप. भागवताचार्य डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांच्या हस्ते आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली डी. एन. एस. ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक गणेश औटी आणि श्री ढोकेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक
कटारिया उपस्थित असणार आहेत. डी. एन. एस बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी नारायण झावरे, व्हा. चेअरमनपदी शिवाजी खिलारी, कार्यकारी संचालकपदी देवराम बांडे यांची निवड करण्यात आली आहे. संचालक तर मंडळामध्ये बाळासाहेब झावरे, बाळासाहेब वाफारे, उत्तम आग्रे, पुजा झावरे, परसराम शेलार, मोहन रांधवण, रंगनाथ गुंजाळ, कैलास नन्हे, उज्वला रोकडे, दिपक गुंजाळ यांचा समावेश आहे.