सावरगाव येथील विद्यार्थ्यांना १०० स्कूल बॅगचे वाटप. माजी सभापती गंगाराम बेलकर यांचे स्तुत्य उपक्रम. पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील स...
सावरगाव येथील विद्यार्थ्यांना १०० स्कूल बॅगचे वाटप.
माजी सभापती गंगाराम बेलकर यांचे स्तुत्य उपक्रम.
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी गंगाराम बेलकर मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
१५ ऑगस्ट अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गंगाराम बेलकर यांच्या वतीने हनुमान विद्यालय सावरगाव येथील शंभर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
गंगाराम बेलकर हे नेहमीच सावरगाव या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी याआधीही या ठिकाणी अनेक शालेय विद्यार्थ्यांना मदत केली आहे. तसेच खेळाडू असतील किंवा महिला यांच्यासाठी ही त्यांनी वेळोवेळी सामाजिक मदत केली आहे. अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हा चांगला उपक्रम राबवला.
यावेळी सावरगाव या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मा. सभापती गंगाराम बेलकर, सरपंच परिषद जिल्हा समन्वयक मोहन रोकडे, सावरगावचे उपसरपंच प्रदीप गुगळे, सुनील बेलकर, शाळेचे मुख्याध्यापक सावरगाव ग्रामस्थ व हनुमान विद्यालयातील विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील काळात सावरगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठीजी मदत लागेल ती पुरवणार लवकरच शाळांना संगणक संच ही देणार
गंगाराम बेलकर
(मा. सभापती पारनेर पंचायत समिती)
..