वासुंदे येथे अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन साजरा विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील वासुंदे ...
वासुंदे येथे अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन साजरा
विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध सांस्कृतिक कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील वासुंदे येथे भारताचा अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वासुंदे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुंदे तसेच न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे येथे ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम साजरा झाला.
यावेळी वासुंदे ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच सुमनताई सैद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालयात जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुंदे येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल झावरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान प्राथमिक शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढत देशाप्रती अभिमान व राष्ट्रभक्तीच्या घोषणा दिल्या.
अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालय मध्ये विविध देशभक्तीपर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी वासुंदे गावचे सरपंच सुमनताई सैद उपसरपंच शंकरराव बर्वे, सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे व्हा. चेअरमन रा. बा. झावरे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, ज्येष्ठ पत्रकार बबन गायखे सर,
प्रगतशील शेतकरी भाऊ सैद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल झावरे, बाळासाहेब पाटील, मा. व्हा. चेअरमन बाळासाहेब झावरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलासराव साठे सर , आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू जगदाळे, दिलीपराव उदावंत शरदराव पाटील सर, रामदास झावरे सर, दादा झावरे, तुकाराम साठे, आदी मान्यवर वासुंदे ग्रामपंचायत व सेवा सोसायटीचे सदस्य, ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वासुंदे, वाबळे वस्ती व न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.