वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष.. रविंद्र गायखे पारनेर राष्ट्रवादीचा नवा चेहरा ! आमदार लंकेंचा कट्टर कार्यकर्ता ते राष्ट्रवादीचा पदाधिकारी संघटन क...
वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष..
रविंद्र गायखे पारनेर राष्ट्रवादीचा नवा चेहरा !
आमदार लंकेंचा कट्टर कार्यकर्ता ते राष्ट्रवादीचा पदाधिकारी
संघटन कौशल्य असलेलं नेतृत्व
संघर्षमय प्रवासाकडून यशस्वी वाटचालीकडे
पारनेर विशेष प्रतिनिधी :
सावरगाव(काळेवाडी)येथील युवा नेतृत्व पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र गायखे यांचा वाढदिवस ४ ऑगस्ट रोजी ३८ वा अभिष्टचितंन सोहळा वाढदिवसानिमित्ताने साजरा होत आहे.
रविंद्र गायखे बद्दल सांगायचे झाले तर, सर्वसामान्य कुंटुबातील व्यक्ती आहे. पण शालेय शिक्षण घेतल्या नंतर रविंद्र गायखे यांनी व्यवसाय करायला सुरवात केली.
एक हरहुन्नरी असणाऱ्या रविंद्र यांना व्यवसाया पेक्षा समाजकारण करण्याची आवड निर्माण झाली.
लहानपणा पासुन तर थोरा-मोठ्यान पर्यंत रवींद्र नेहमी आदराने आणि मनमिळावु पणाने राहत असल्या मुळे समाजाला त्यांच्या प्रति आदर निर्माण झाला .
रवींद्र गायके समाजातील छोट्या- मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता.
समाजकारण करत असताना, राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचे रवीने ठरवले. व शिवाजीशेठ बेलकर यांचा आर्शिवाद घेऊन रवी पहिल्यादा २०१० साली ग्रांमपचायतला मैदानात उतरला आणि शिवाजीशेठ याच्या आर्शिवादाने आणि जनतेच्या आर्शिवादाने प्रचंड मताधिक्याने निवडणुन ही आला.
त्यानंतर २०१५ , २०२० अशा सलग तीन वेळा रवींद्र गायखे ग्रामपंचायत सदस्य झाले .
ग्रामपंचायत मध्ये सर्वाना न्याय मिळवून देण्याचे काम युवा नेते रविंद्र गायखे नेहमी करत असतात, प्रत्येक अडचणीला धावणारा समाजसेवक म्हणुन आज त्यांची समाजात ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान रवींद्र गायके यांचे समाजातील काम पाहून आमदार निलेश लंके यांनी गायखे यांना 2021 साली पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड केली.
लहान असो मोठा , काम कुठले ही असो रवींद्र करणार ह्या भावनेने लोक त्यांच्या कडे जातात आणि तोही , आपल्या परिने ते काम निस्वार्थ भावनेने करत असतो .
आमदार लंकेसाहेब याच्या मार्फत अनेक कामे त्यानी सावरगाव मध्ये केली आहेत ,सावरगांवच्या विकास कामात रवींद्रचा खुप मोठा मोलाचा वाटा आहे.
संघटन कौशल्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पारनेर तालुक्यात सक्रिय असलेला युवा चेहरा रवींद्र गायखे म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी विचारांचा प्रबळ नेता कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सक्रिय काम करत असलेले रवींद्र गायके हे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांचे सच्चे कार्यकर्ते आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असलेले रवींद्र गायके हे पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीमध्ये तालुका उपाध्यक्ष म्हणून सध्या काम करत आहेत सावरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्या कार्याची सुरुवात करून सावरगाव येथील दिन दलित गरीब आदिवासी कुटुंबांना आधार देण्याचा ते प्रयत्न करतात. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सावरगाव सारख्या भागांमध्ये आज अनेक विकासाची कामे रवींद्र गायखे यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. समाजामध्ये काम करत असताना आपण सामाजिक भान ठेवून समाजासाठी काम करत राहिले पाहिजे हे ब्रीद आत्मसात करत खऱ्या अर्थाने रवींद्र गायखे हे पारनेर तालुक्यात पक्ष संघटनेत काम करत आहेत. पारनेर तालुक्यातील पक्ष संघटनेतील सगळ्यात उत्साही पदाधिकारी म्हणून रवींद्र गायखे यांच्याकडे पाहिले जाते. आमदार निलेश लंके यांचा विश्वासू सहकारी म्हणून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असलेले काम हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना सावरगाव भागामध्ये अनेक विकासाची कामे त्यांनी मार्गी लावली. सामाजिक उपक्रम राबवत आमदार निलेश लंके यांना त्यांनी ताकद दिली. युवक संघटना ही त्यांच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये बळकट होत असून पक्ष संघटना बळकट करून खऱ्या अर्थाने पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या पाठीमागे ते ताकद उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार निलेश लंके यांचे पारनेर तालुक्यात सुरू असलेले विकासाचे काम पाहून खऱ्या अर्थाने त्यांची प्रेरणा घेऊन रवींद्र गायखे हे समाज हिताचे मोठे काम करत आहेत.
सावरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सावरगावचे असलेले पारनेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे सभापती गंगारामशेठ बेलकर व पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव बेलकर यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र गायखे हे सावरगाव या ठिकाणी काम करत असून सावरगाव येथील अनेक कामे त्यांनी मार्गी लावले आहेत. गावात त्यांनी विविध उपक्रम आजपर्यंत राबवले असून रवींद्र गायके हे सावरगाव ग्रामपंचायत मध्ये गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे या माध्यमातून त्यांनी ग्राम स्तरावर विविध शासकीय योजना राबवून सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. विद्यार्थी वर्गाच्या हितासाठी रवींद्र गायके हे काम करतात अशा या उदारमतवादी युवा नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...