वासुंदे गावची कन्या बनली संगमनेरच्या बिरेवाडीची "कारभारीण" नीलम पांडुरंग ढेंबरे यांची बिरेवाडीच्या सरपंच'पदी निवड सुजितराव झाव...
वासुंदे गावची कन्या बनली संगमनेरच्या बिरेवाडीची "कारभारीण"
नीलम पांडुरंग ढेंबरे यांची बिरेवाडीच्या सरपंच'पदी निवड
सुजितराव झावरे पाटील यांनी दिल्या निवडीनंतर शुभेच्छा
पारनेर प्रतिनिधी (गणेश जगदाळे) :
संगमनेर तालुक्यासाठी राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या साकुर पठार भागावरील बिरेवाडी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. नुकतीच बिरेवाडी ग्रामपंचायत'च्या सरपंच पदी पारनेर तालुक्यातील वासुंदे गावची कन्या असलेल्या नीलम पांडुरंग ढेंबरे यांची निवड झाली. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनल व शिवसेना प्रणित जय बजरंग बली ग्रामविकास पॅनल हे समोरासमोर होते. संख्याबळ ९ असलेल्या बिरेवाडी ग्रामपंचायत मध्ये या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले होते तर जय बजरंग बली ग्रामविकास पॅनलचे ३ उमेदवार हे विजयी झाले होते.
दरम्यान सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी समोरील पॅनल कडून उमेदवारी अर्ज न आल्यामुळे नीलम पांडुरंग ढेंबरे यांची निवड ही बिनविरोध झाली. सरपंच पदी निवड झाल्यानंतर ढेंबरे समर्थकांनी एकच जल्लोष केला.
नीलम ढेंबरे या मूळच्या पारनेर तालुक्यातील वासुंदे गावच्या कन्या असून कौटुंबिक राजकीय वारसा त्यांच्यासोबत आहे. त्यांचे आजोबा स्व. मारुती झावरे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते तर त्यांचे वडील गोविंद उर्फ लहानू झावरे हे वासुंदे गावचे माजी उपसरपंच आहेत. वासुंदे येथील त्यांचे झावरे कुटुंब हे एक प्रतिष्ठित मोठे कुटुंब म्हणून परिसरात परिचित आहे.
वासुंदे परिसरामध्ये गोविंद उर्फ लहानू झावरे यांच्या कुटुंबाचे असलेले राजकीय सामाजिक योगदान हे निश्चितच अभिमानास्पद आहे. आपल्या वडिलांनी दिलेल्या सामाजिक कामाचा उपयोग निलम पांडुरंग ढेंबरे नक्कीच संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी गावच्या सरपंच पद भूषवताना करतील यात शंका नाही.
नीलम पांडुरंग ढेंबरे या अतिशय शिस्तबद्ध व तेवढ्याच आक्रमक मेहनती व प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द असलेल्या महिला नेतृत्व आहेत. निश्चितच ढेंबरे कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे बिरेवाडी गावच्या सरपंच पदी त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मिळालेल्या संधीचे ते नक्कीच सोने करतील.
नीलम पांडुरंग ढेंबरे यांची सरपंच पदी निवड झाल्यानंतर वासुंदे येथे एकच जल्लोष करण्यात आला. त्यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी निवडीबद्दल अभिनंदन पर शुभेच्छा दिल्या.