बाभुळवाडे येथील विद्यार्थ्यांना आपले गाव फौंडेशन संस्थेच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप पारनेर/प्रतिनिधी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत...
बाभुळवाडे येथील विद्यार्थ्यांना आपले गाव फौंडेशन संस्थेच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप
पारनेर/प्रतिनिधी :
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रम निमित्ताने बाभुळवाडे गावातील पीराणी वस्ती, नवले वस्ती येथील जि. प. शाळा येथील ११० विद्यार्थ्यांना आपल गाव फाउंडेशनच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी किशोर पंढरीनाथ जगदाळे, विशाल सुधाकर जगदाळे, विशाल दिलीप खणकर, विजकुमार गुंजाळ आणि मनीषा विशाल बोरुडे यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. त्याबद्दल आपले गाव फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर यांनी या मान्यवरांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर, सरपंच वैशाली जगदाळे, उपसरपंच बाळासाहेब नवले, ज्येष्ठ नागरिक जयराम जगदाळे, पंढरीनाथ जगदाळे गुरुजी, विजकुमार गुंजाळ, बी. आर.जगदाळे, बाळकृष्ण जगदाळे, संतोष जगदाळे, प्रकाश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य सविता जगदाळे, भावना जगदाळे, भिकाजी जगदाळे, बाबा पठाण, कैलास बोरुडे, स्वप्नील जगदाळे, चंद्रकांत जगदाळे, देवेंद्र जगदाळे, समीर जगदाळे, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. आपले गाव फौंडेशन अध्यक्ष डॉ सुरेश खणकर यावेळी म्हणाले फौंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून लोकसहभागातून सामाजिक कार्याला पाठबळरुपी मदत करण्याचे काम होत आहे.
गाव व परिसरात विकासाभिमुख कामे झाली पाहिजेत, गोरगरीब गरजू घटकांना मदत मिळाली पाहिजे, सामाजिक कामांच्या माध्यमातून गावचा विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट ठेउन फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य कार्यरत असून यासाठी गावातील तसेच पुणे मुंबई व राज्यात नोकरी, व्यवसाय या माध्यमातून कार्यरत असणारे मान्यवर लोकसहभागातून मदत करतात अशाप्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजित करुन ११० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. असल्याची माहिती डॉ. खणकर यांनी दिली आहे.
COMMENTS