धक्कादायक बातमी.... जवळा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून.. पारनेर/प्रतिनिधी : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन...
धक्कादायक बातमी....
जवळा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून..
पारनेर/प्रतिनिधी :
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा गळा दाबून पतीने खून केल्याची घटना तालुक्यातील जवळा येथे घडली असून या प्रकरणी पतीस पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महेश भास्कर सालके (३५, रा. जवळा, ता. पारनेर) असे संशयिताचे नाव आहे. तर
रूपाली महेश सालके असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मयत रुपालीचा भाऊ किरण भास्कर डोखे ( रा. डोणगाव, ता. वैजापूर जि. औरंगाबाद) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, २०११ साली संशयित महेश सोबत मयत रूपाली यांचा विवाह झाला होता. महेशला दारूचे व्यसन असल्याने तो रूपाली यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन शारिरिक व मानसिक त्रास देत होता. १३ ऑगस्टला रूपाली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ते रुग्णालयात पोहोचले असता त्यांना रूपाली मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित महेश सालके याला अटक केली. त्याला न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपनिरीक्षक हनुमंत उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.