घरावर तिरंगा उभारून राष्ट्रीय एकात्मता जपा : राजेश्वरी कोठावळे पारनेर प्रतिनिधी : स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट...
घरावर तिरंगा उभारून राष्ट्रीय एकात्मता जपा : राजेश्वरी कोठावळे
पारनेर प्रतिनिधी :
स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान साजरे होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विविध उपक्रम राबवले जात असून केंद्र सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर आपला तिरंगा झेंडा फडकवून राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी व्यक्त केले.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे म्हणाल्या की राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा उभारून देशाप्रती असलेला आदरभाव जोपासला पाहिजे. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना निश्चितच आपण आज विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहोत. आज आपल्या स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात महिलांनी अनेक यशाची उंच उंच शिखरे सर केली आहेत यशस्वी शिखरावर उभ्या राहून आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना महिला सक्षमीकरणासाठी देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर काम होणे गरजेचे आहे. असेही यावेळी बोलताना राजेश्वरी कोठावळे म्हणाल्या.
विकासात्मक पातळीवर काम करत असताना निश्चितच देश अभिमान आपण जागृत ठेवणे गरजेचे असून आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता व देशभक्ती आपण जपली पाहिजे. तिरंग्याचा अभिमान ठेवत आपण सर्वांनी अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आपल्या घरावर भारताचा सार्वभौम असलेला तिरंगा डौलाने फडकवून खऱ्या अर्थाने प्रत्येकाने देशभक्ती दाखवून द्यावी. असे ही मत यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी व्यक्त केले.