वासुंदे विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना कपडे वाटप अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त सुजित झावरेंचा उपक्रम पारनेर प्रतिनिधी : संपूर्ण देश...
वासुंदे विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना कपडे वाटप
अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त सुजित झावरेंचा उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
संपूर्ण देशात स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे येथील विद्यालयामध्ये स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून वासुंदे येथील आदिवासी गरीब सर्वसामान्य दलित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय कपडे वाटप करण्यात आले. स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधत हा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालयात राबविण्यात आला. सुजित राव झावरे पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच पारनेर तालुक्यात व वासुंदे गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेली ही शालेय कपड्याची मदत निश्चितच त्या कुटुंबाला आधार ठरणारी आहे.
अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालयांमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील ध्वजारोहण जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन वासुंदे ग्रामपंचायत मा. सदस्य जालिंदर वाबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी वासुंदे गावचे सरपंच सुमनताई सैद, उपसरपंच शंकरराव बर्वे, सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, ज्येष्ठ पत्रकार बबन गायखे सर, प्रगतशील शेतकरी भाऊ सैद, कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक पो. मा. झावरे बाळासाहेब पाटील,
धनंजय उदावंत शरदराव पाटील सर ग्रामपंचायत सदस्य विलास साठे, बाळासाहेब शिंदे, मा व्हा. चेअरमन बाळासाहेब झावरे, खंडू टोपले, लहानु झावरे, अमोल उगले, दत्तात्रय बर्वे, निवृत्ती बर्वे, कलाशिक्षक संतोष क्षीरसागर आदी वासुंदे येथील ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
कलाशिक्षक संतोष क्षीरसागर सरांचा सन्मान..
वासुंदे येथील कलाशिक्षक संतोष क्षीरसागर यांना नुकताच राज्यस्तरीय कलाशिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त झाला. संतोष क्षीरसागर यांचे हस्तलेखन फलक लेखन उत्तम आहे त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी शब्दबद्ध केली आहे. एक कलात्मक शिक्षक म्हणून त्यांचा परिसरात परिचय आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना कलाशिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते.
..