गॅस सिलेंडर चोरणारा सुपा पोलिसांच्या ताब्यात पारनेर/प्रतिनिधी : सुपा एमआयडीसीतील एका एजन्सीमधून सिलेंडर चोरणाऱ्या चोरट्याला सुपा पोलिसांनी ...
गॅस सिलेंडर चोरणारा सुपा पोलिसांच्या ताब्यात
पारनेर/प्रतिनिधी :
सुपा एमआयडीसीतील एका एजन्सीमधून सिलेंडर चोरणाऱ्या चोरट्याला सुपा पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ऋषिकेश आगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा तपासात असताना पोलीस नाईक ठोंबरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुपा येथील अमोल बबन पवार यांच्या घरी चोरीस गेलेले सिलेंडर मिळून येईल. नंतर सहाय्यक फौजदार ओहोळ, खैरे पोलीस, नाईक, ठोंबरे यांनी पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत अमोल बबन पवार यास मुद्देमालासह अटक केले. यावेळी त्या कडून एक व्यावसायिक गँस टाकी, एक घरगुती वापरातील गँस टाकी व लहान चार पाच टाक्या जप्त केल्या.
सदर आरोपीला तीन दिवस पोलीस कस्टडी चालू असून अधिक तपास सुरू आहे. सुपा पोलिसांनी आगरकर यांच्या फिर्यादीवरुन अमोल पवार यांच्या विरुध भ.द.स.क २७४ / २२ अतंर्गत गुन्हा दाखल केला असुन त्यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पवार यास तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीसानी गुन्हेगारास अटक केले, यावेळी साह्यक फौजदार सुनिल कुटे संदीप चौधरी संपत खैरे पो ना यशवंत ठोबरे यावेळी उपस्थित होते. गुन्हेगाराने यापुर्वी काही गुन्हे केले आहेत का तसेच त्याचे अजुन कोणी सहकारी आहेत का या दृष्टीने ने ही सुपा पोलिस तपास करत आहेत.
COMMENTS