वासुंद्याच्या शिक्री-ठाकरवाडीतील आदिवासी घरकुलापासून वंचित आमदार निलेश लंकेच्या समोर मांडल्या व्यथा पारनेर/प्रतिनिधी : स्वतंत्र्यपूर्वकालापा...
वासुंद्याच्या शिक्री-ठाकरवाडीतील आदिवासी घरकुलापासून वंचित
आमदार निलेश लंकेच्या समोर मांडल्या व्यथा
पारनेर/प्रतिनिधी :
स्वतंत्र्यपूर्वकालापासून पारनेर तालुक्यातील वासुंदे गावातील शिक्री-ठाकरवाडी येथील आदिवासी ठाकर व भिल्ल समाजातील अनेक आदिवासी कुटुंब घरकुलापासून वंचित असून अनेक वेळा घरकुल मिळण्यासाठी अर्ज दाखल करूनही अद्याप पर्यंत घरकुल मिळाले नाही. गावातील पदाधिकारी मात्र तोंडे पाहून घरकुल मंजूर करत असल्याचा आरोप या आदिवासींनी आमदार निलेश लंके यांच्या भेटीदरम्यान केला असून आपल्या अनेक समस्या व्यथेच्या माध्यमातून या आदिवासींनी मांडल्या आहे. यावेळी आपल्या विविध समस्यांची निवेदन आमदार निलेश लंके यांच्यासह गटविकास अधिकारी किशोर माने यांना देण्यात आले. शबरी योजनेच्या माध्यमातून किंवा ठक्कर बप्पा योजनेच्या माध्यमातून ही प्रकरणे मार्गी लावण्याच्या आश्वासन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिले आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी सुभाष केदार पोपट दुधवडे हेमंत मधे संजय केदार दादाभाऊ मधे डॉ उदय बर्वे डॉ बाबासाहेब गांगड गाडी लोहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दादू भालके यांच्या सह वासुंदे येथील जवळपास २५ ते ३० आदिवासी कुटुंबीयांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांची भेट घेत आम्हाला आमच्या हक्काचा निवारा या घरकुलाच्या माध्यमातून मिळावा अशी साद घातली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही ग्रामपंचायतीकडे घरकुलाची मागणी केली असून अनेक वेळा प्रकरणी सादर करूनही ती मंजूर करण्यात आलेली आहे.
तर दुसरीकडे आम्हाला ना धड प्यायला पाणी ना डोक्यावर छप्पर ना लाईट ना सोयीसुविधा.. अशी अवस्था अनेक वर्षापासून असून पावसाळ्यात आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे किमान आमच्या लोकांवर घरकुलाच्या माध्यमातून छप्पर देऊन आम्हाला आधार द्यावा अशी मागणी या आदिवासींनी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली.या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
शिक्री ठाकरवाडीच्या समाज मंदिरासाठी १५ लाख रुपयांचा निधी.. आमदार निलेश लंके
वासुंदे येथील शिक्री ठाकरवाडी येथे जवळपास २५० ते ३०० आदिवासी कुटुंबीय असून ठाकरवाडी येथील समाज मंदिर व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यासंबंधीची लेखी निवेदन सोमवारी आमदार देतात त्यांनी या समाज मंदिरासाठी १५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षाची मागणी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याचे समाधान व्यक्त करत या समाज मंदिरामध्ये धार्मिक व इतर कार्यक्रमांसाठी या सभामंडपाचा उपयोग होईल असेही सुभाष केदार पोपट दुधवडे हेमंत मधे संजय केदार दादाभाऊ मधे म्हणाले आहेत.
COMMENTS