आळकुटी येथील विद्यार्थ्यांसाठी सैन्य भरती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पारनेर/प्रतिनिधी : सैन्यभरतीला प्राधान्य देण्याची गरज असून यासाठी युव...
आळकुटी येथील विद्यार्थ्यांसाठी सैन्य भरती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
पारनेर/प्रतिनिधी :
सैन्यभरतीला प्राधान्य देण्याची गरज असून यासाठी युवकांनी भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी व्यक्त केले आहे. आळकुटी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शेळके यांच्या संस्थेने सैन्य भरती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ॲपेक्स संस्थेचे संचालक लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांनी यावेळी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ९ वी, १०वी, ११वी, व १२ वी च्या विद्यार्थ्यां साठी घेण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक व विध्यार्थ्यांचे पालक ही उपस्थित होते.
ले. कर्नल साहेबराव शेळके यांनी प्रस्ताविक केले आणि अभियानाचा उद्देश संक्षिप्तपणे मांडला. सुरुवातीला शिरूर, श्रीगोंदा, पारनेर तसेच नगर तालुक्यातील हायस्कूल व कॉलेजसाठी राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ भास्कर शिरोळे यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके व लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर यांना धन्यवाद देऊन त्याचा सत्कार केला.
तसेच प्राचार्य जाधव यांनी असे अमृत महोत्सवी असे कार्यक्रम कायमस्वरूपी आयोजित करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमास ऊपस्थित. यावेळी श्री. स्वामी समर्थ सहकारी बॅंकेचे चेअरमन ॲड. अशोक शेळके,
निवृत्त डेपुटीनिवृत्त डेपुटी कमांडेंट सीआईएसएफ विष्णू दादा भोसले, साईनाथ विद्यालयाचे प्राचार्य मंगेश जाधव, विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शरद पारखे, अळकुटीचे उपसरपंच आरिफ पटेल, माजी उपसरपंच शरद घोलप, श्रीमती लताताई घोलप, दरोडीचे माजी उपसरपंच खंडेराव चौगुले, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाराम शिंदे यांनी कार्यक्रमाचे असे सूत्र संचलन केले. ऊपस्थितांचे आभार, सीआयएसएफचे सेवा निवृत्त डेपुटी कमांडट विष्णू भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगिताने झाली.