स्वतंत्र दिनानिमित्त तिखोल मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन पारनेर प्रतिनिधी : तिखोल येथे १५ ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने गाव...
स्वतंत्र दिनानिमित्त तिखोल मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन
पारनेर प्रतिनिधी :
तिखोल येथे १५ ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम समता विद्यालय या ठिकाणी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर तिखोल ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचारी राजू आनंदा ठाणगे, राघू साळवे, व आशाताई सेविका सविता संपत ठाणगे यांच्या हस्ते तिरंग्याचे पूजन करण्यात आले व अंगणवाडी सेविका अनुसयाताई मनोहर साळवे यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे झेंडावंदन झाले त्यानंतर विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गावामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भारतीय सैन्य दलात सेवेमध्ये असलेले देविदास जयसिंग ठाणगे मेजर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. प्रगतशील शेतकरी शामकांत सहकारी ठाणगे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचे भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
यावेळी उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या वतीने बक्षिस देण्यात आले. त्याचप्रमाणे कै. पोपट पांडुरंग ठाणगे यांच्या स्मरणार्थ संदीप पोपट ठाणगे यांनी समता विद्यालय तिखोल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखोल मधील भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व व इयत्ता दहावी मध्ये प्रथम, द्वितीय, आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली. त्याच प्रमाणे शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले.
अखंड हरिनाम सप्ताहच्या काळामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पवित्र असे अन्न वाढण्याचे काम केले होते. त्याबद्दल माजी सरपंच अनिल तांबडे यांच्या वतीने विद्यालयाला आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्यात आली.
तिखोल सैनिक संघटना यांच्या वतीने तिखोल मधील सर्व आजी माजी सैनिकांच्या पत्नी व त्यांच्या माता यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक, सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामस्थ,तरुण सहकारी मित्र, व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
तिखोल येथे ग्रामपंचायत शिपाई पाणीपुरवठा कर्मचारी अशा सेविका यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधत सर्वसामान्य स्तरातील व्यक्तीला हा मान देण्यात आला तिखोल ग्रामपंचायत ने हा अनोखा उपक्रम राबविला आमदार निलेश लंके यांच्या विचार प्रेरणेने खऱ्या अर्थाने हा उपक्रम तिखोल ग्रामपंचायत मध्ये राबविला गेला. तिखोल ग्रामपंचायतने राबवलेल्या या उपक्रमाचे तालुक्यात स्वागत होत आहे असे मत यावेळी युवा नेते संदीप ठाणगे व्यक्त केले.