वाडेगव्हाण येथील हॉटेलवर छापा; पाच जण कोण घेतले ताब्यात तब्बल १८ लाखाचा माल जप्त; मोठी कारवाई पारनेर/प्रतिनिधी : नाशिक येथील विशेष आयजी ...
वाडेगव्हाण येथील हॉटेलवर छापा; पाच जण कोण घेतले ताब्यात
तब्बल १८ लाखाचा माल जप्त; मोठी कारवाई
पारनेर/प्रतिनिधी :
नाशिक येथील विशेष आयजी पथक व सुपा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नगर पुणे महामार्गावर वाडेगव्हाण येथील हाॅटेलवर छापा टाकून लोंखडी स्टिल ( बांधकाम सळया ) चोरून विक्री करणारी टोळी पकडली व त्यांच्याकडून १७ लाख ७६ हजार ८७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पो. ह. शेख शकील अहमद नाशिक विशेष पोलिस पथक यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि.४ रोजी रोजी पहाटे ६:३० वाजता सुपा पोलीस स्टेशन जि. अहमदनगर हद्दीत बेलवंडी फाट्याजवळ वाडेगव्हाण नगर पुणे हायवे लगत असलेल्या हॉटेल मातोश्रीचे पाठीमागे पत्र्यांचे कंपाऊंड लगत असलेल्या मोकळ्या जागेत ता. पारनेर जि. अहमदनगर.आरोपी मजीबुल रेहमान इलाकत गद्दी वय.४२ वर्षे रा. तौलीहवा जि.कपीलवास्तु नेपाळ सध्या रा.मातोश्री हॉटेल, वाडेगव्हाण, बेलवंडी फाट्याजवळ, जि. अहमदनगर, दिलशाद खान अन्सार खान वय २४ वर्षे रा. चककाजीपुरा थाना गाजीपुरा जि. फतेहपुर राज्य उत्तरप्रदेश, रिजवान खान युसुफ खान वय ३२ वर्षे रा. ज्वालागंज, पिरणपुर मोहल्ला, पाण्याच्या टाकीजवळ, घर.नं. ३०४, फेतहपुर, जि. फतहपुर राज्य उत्तरप्रदेश सध्या रा.मातोश्री हॉटेल, वाडेगव्हाण, बेलवंडी फाट्याजवळ, जि. अहमदनगर, आफताब लल्लन खान वय १९ वर्षे रा. लखनऊ राज्य उत्तरप्रदेश सध्या वाळा राजगुरु यांच्या घरात भाडे तत्वावर, बस स्टॅन्ड जवळ, शिरुर जि.पुणे, लल्लनशेठ खान सध्या रा. शिरुर जि.पुणे (पाहिजे आरोपी), अजीत दत्तात्रय मासाळ वय २५ वर्षे सध्या रा. चिखली, मोरे वस्ती ता.निगडी जि. पुणे. मुळ रा. वाखवड ता. भुम जि.उस्मानबाद, बाळु शेळके रा. वाडेगव्हाण जि.अहमदनगर हे वहान क्रमांक एम एच १६ बी ७९५५ या वहानातुन लोखंडी सळया वजन काटा कटावनी आदी साहित्यांच्या मदतीने वहानातुन माल काढून काळ्या बाजारात विकत आसताना रंगेहात पकडले.
यावेळी त्यांच्याकडून १० हजार रुपये कि.चे एक स्टिल (आसारी) कापण्यासाठी असलेली लोखंडी गॅस कटर नोझलसह त्यास भारत कंपनीची गॅस टाकी व लोखंडी निमुळते सिलेंडर ज्यावर एमजी ६९४१० असे लिहिलेले घटनास्थळावर मिळुन आले. १५ हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रीक वजन काटा डिस्ल्पे सह, १ हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी हातोडा घटनास्थळावर मिळुन आला, ५०० रूपये किंमतीची स्टिल पकडण्यासाठी वापरत असलेली कैच्ची घटनास्थळावर मिळुन आली, ५०० रूपये किंमतीचा एक लोखंडी पान्हा घटनास्थळावर मिळुन आला.
५०० रूपये किंमतीची एक लोखंडी कटावणी घटनास्थळावर मिळुन आली, १५ लाख ७६ हजार २१२ एकुण किमतीचा मुद्देमाल त्यात ५ लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच. ४२ बी ७९५५ असलेला त्याचे पाठीमागील अष्ट विनायक ट्रान्सपोर्ट जालना त्यावर बिल्टी प्रमाणे एकुण १६,२८० किलो ग्रॅम वजनाचे ८ व १० एम एम ने भरलेले स्टिल (आसारी) असलेला ट्रक त्यापैकी ७८ किलो वजनाचा ८ एम एम चा १ बंडल ट्रक क्रमांक एम.एच.४२ बी ७९५५ मधुन जमीनीवर काढलेला बिल्टीप्रमाणे घटस्थळावर मिळुन आला.
८१ लाख ७३ हजार १६० रूपये एकुण किंमतीचा मुद्देमाल त्यात २० फुट, १८ फुट, ७ फुट व ८ फुट लांबीचे लोखंडी भरीव ३१ रॉड, २० फुट, १५ फुट, १२ फुट लांबीचे १३ लोखंडी पाईप, २० फुट लांबीचे ११ बारीक स्टिलचे पाईप, २० फुट लांबीचे ३ लोखंडी पट्ट्या, २० फुट लांबीचे १३ एल आकाराच्या लोखंडी पट्ट्या असा एकुण २३४० किलो ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किलो ७४ रुपये प्रमाणे घटनास्थळावर मिळुन आला एकुण १७ लाख ७६ हजार ८७२ रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
शेख यांच्या फिर्यादी वरुन स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक अनिल कटके, पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमलदार सा.फौ सुनिल कुटे यांनी वरील आरोपीवर गुन्हा दाखल केला असुन यातील पाच आरोपीना अटक केली व दोघाचा शोध घेतला जात आहे. त्यांच्यावर भा.द.स.क. ३७९,४०७,४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके हे स्वतः करत आहेत. या छाप्यात नाशिक पथकासह सुपा पोलिस स्टेशनचे छबु कोतकर, मुसळे आदी सहभागी झाले होते.