एस टी बसच्या धडकेत स्कुटरचालकाचा मृत्यू सुप्या जवळील पवारवाडी घाटात महामार्गावर घडली घटना पारनेर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावर सुप्याजवळ...
एस टी बसच्या धडकेत स्कुटरचालकाचा मृत्यू
सुप्या जवळील पवारवाडी घाटात महामार्गावर घडली घटना
पारनेर/प्रतिनिधी :
नगर-पुणे महामार्गावर सुप्याजवळील पवारवाडी घाटात एसटी बसने स्कुटरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटर चालकाचा मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनी सोमवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली. दिनेश महेश दाणे (रा. भुषण नगर, केडगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत सुपा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी नगर पुणे महामार्गावर याबाबत सुपा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी पुणे महामार्गावर गावाजवळील पवारवाडी नगर सुपा घाटातील पहिल्या वळणावर नगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेली शेवगाव- पुणे एसटी बसने (क्र. एमएच १४ बीटी ४८७९) याच गाडीच्या पुढे चालत असलेल्या स्कुटरला पाठीमागून जोराची धडक दिली.
यात स्कुटर चालक दिनेश दाणे हे डांबरी रोडवर जोरात पडले त्यात त्यांना जबर मार लागला. परिसरातील नागरिकांनी जखमी दिनेश दाणे यांना तातडीने सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले.
घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
याबाबत बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.