विद्यार्थ्यांसाठी गोपाल पंगत; भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळांचे आयोजन वडगाव सावताळ येथे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रम अमृत महोत्सवी वर्ष...
विद्यार्थ्यांसाठी गोपाल पंगत; भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळांचे आयोजन
वडगाव सावताळ येथे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रम
अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना जपली सामाजिक बांधिलकी
पारनेर प्रतिनिधी :
संपूर्ण देशात अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरे केले जात आहे. हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. या अभियानाचे औचित्य साधत पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला आहे वडगाव सावताळ परिसरातील आंबेमळा, शिंदेमळा, तरटीफाटा, खामकर झाप, माळवाडी, ईश्वरझाप, तांबेवाडी आणि गाजदीपूर व वडगाव सावताळ गावठाण येथील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शनिवारी गोपाल पंगत दिली. वडगाव सावताळ येथे आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी भाऊसाहेब शिंदे म्हणाले की वडगाव सावताळ येथे आम्ही हर घर तिरंगा अभियान राबविले आहे.
वडगाव सावताळ ग्रामपंचायत सरपंच बाबासाहेब उर्फ मिठू शिंदे महाराज यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहे संपूर्ण गाव या स्वतंत्र महोत्सवी हर घर तिरंगा अभियानात सहभागी झाले आहे. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद या अभियानात घेतला असून गावातून तिरंगा यात्रा काढत जनजागृती केली. सर्व विद्यार्थ्यांना मित्र मंडळाच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान स्वतंत्र महोत्सवी वर्षानिमित्त भाऊसाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी गोपाल पंगत घालून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
यावेळी सर्जेराव रोकडे सर, गो. या रोकडे गुरुजी, अनिल गायकवाड, भाऊ शिंदे, मंगेश रोकडे, अर्जुन रोकडे, राजू रोकडे, सुनील शिंदे, निवृत्ती शिंदे, कुणाल शिंदे, संदीप खंडाळे, रवी शिंदे, सतीश तीखोळे, दादाभाऊ रोकडे, आप्पा तिखोळे, दत्ता रोकडे, योगेश शिंदे, आदी वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ ग्रामस्थ विद्यार्थी सर्व शाळांचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
...