कान्हुर पठार मुक्कामी बससेवा पुर्ववत करण्याची मागणी. पारनेर प्रतिनिधी : पारनेर आगाराची अ.नगरहुन कान्हुर पठार येथे मुक्कामी येणारी बससेवा पु...
कान्हुर पठार मुक्कामी बससेवा पुर्ववत करण्याची मागणी.
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर आगाराची अ.नगरहुन कान्हुर पठार येथे मुक्कामी येणारी बससेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी कान्हुर पठार, टाकळी ढोकेश्वर तसेच परीसरातील विविध गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.सदर बस नगरहुन कान्हुर पठार येथे मुक्कामी येत होती.मध्यंतरी एस.टी.कर्मचारी संप झाल्यानंतर नगर- कान्हुर बस सेवा बंद झाली होती ती अजूनही बंदच आहे.टाकळी ढोकेश्वर व परीसरातील अनेक गावातील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी अहमदनगर येथील विविध शाळा, महाविद्यालयात ये जा करीत असतात सदर बस सकाळी ६ वाजता कान्हुर येथून
निघून ७.३० वाजेपर्यंत नगर येथे पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी शाळा, महाविद्यालयात वेळेवर पोहचता येत होते.
मध्यंतरी शाळा,महाविद्यालये ऑनलाईन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना बस बंद असल्याने कोणतीही अडचण येत नव्हती पण सध्या शाळा महाविद्यालये
रेग्युलर सुरू होत आहेत तसेच विविध अभ्यासक्रमांच्या
परीक्षा सुरू आहेत त्यासाठी अ.नगर शहरात वेळेवर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना दुचाकीवरून किंवा खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो ते देखील वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांची ससेहोलपट होत आहे.
टाकळी ढोकेश्वर हे गाव महामार्गावर आहे परंतु इतर कोणत्याही आगाराची बस या वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी याकरिता सदर कान्हुर पठार मुक्कामी बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यावर डोळेझाक केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.