गणपती मंदिरात भरते जिल्हा परिषदची शाळा; पारनेर तालुक्यातील प्रकार पारनेर/प्रतिनिधी : रायतळे येथील गणेवाडीतील जिल्हा परीषदेच्या शाळेत पहि...
गणपती मंदिरात भरते जिल्हा परिषदची शाळा; पारनेर तालुक्यातील प्रकार
पारनेर/प्रतिनिधी :
रायतळे येथील गणेवाडीतील जिल्हा परीषदेच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत. मात्र, या चार वर्गांसाठी जिल्हा परीषदेची एकच खोली उपलब्ध आहे. त्यामुळे या खोलीत दोन वर्ग बसविले जातात. तर दोन वर्ग चक्क गेली दोन वर्षांपासून येथील गणपती मंदीरात बसविले जात आहेत.
गणेशवाडी येथे जिल्हा परीषदेच्या चार वर्ग आहेत. त्यासाठी दोन वर्गही होते. मात्र, एक खोली जुणी व खराब झाल्याने तिचे दोन वर्षापुर्वीच निर्लेखन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे आता एकच खोली असून त्या खोलीतही दोन वर्ग बसविले जातात. तर दोन वर्ग गणपती देवतेच्या मंदीरात बसविले जात आहेत. त्यामुळे दोन वर्षापासून ही छोटी मुले शिक्षणाचे धडे गणपती मंदिरात गिरवत आहेत.
येथे जिल्हा परीषदेची खोली मंजूरही झाली आहे. मात्र, अद्यापही त्या खोलीचे बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे आता तातडीने जिल्हा परीषदेने आमच्या मुलांसाठी शाळा खोली द्यावी, अशी मागणी येथील पालकांनी केली आहे. तसेच आम्ही लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही पालकांनी सांगितले.
COMMENTS