अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात घटना सुपा परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्...
अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात घटना
सुपा परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात पुणे - नगर महामार्गावर दि. ८ रोजी रात्री पळवे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार झाला.
याबाबत सुपा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुळशीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पीएसआय पवार, सहाय्यक फौजदार सुनील कुटे व इतर सहकारी महामार्गावर गस्त घालत असताना सोमवारी रात्री ९.३० वाजेचे दरम्यान नगर पुणे महामार्गावरील हॉटेल गारवासमोर एक ३० ते ३५ वर्षे वयाचा पादचारी गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला.
पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता, सदर व्यक्ती मयत झालेली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. सदर व्यक्तीची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास त्यांनी सुपा पोलिस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.