ओंकार गुंड यांच्याकडे आता उत्तर नगर जिल्ह्याचीही जबाबदारी संघटनात्मक कामाला मिळाला न्याय अहमदनगर प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील राजकीय घराणे...
ओंकार गुंड यांच्याकडे आता उत्तर नगर जिल्ह्याचीही जबाबदारी
संघटनात्मक कामाला मिळाला न्याय
अहमदनगर प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील राजकीय घराणे गुंड कुटुंबातील असलेले ओंकार गुंड यांची संघटनात्मक कौशल्य पाहून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी अहमदनगर दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ओंकार गुंड यांना आता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. ओंकार गुंड हे आता अहमदनगर उत्तर दक्षिण दोन्हीही विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून यापुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम पाहतील असं प्रसिद्धीपत्रकच प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी काढले आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार मागील काळात ज्या पद्धतीने आपण अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात संघटनेचे काम उभे केले त्याचप्रमाणे उत्तर भागात देखील ते उभे कराल ही अपेक्षा व्यक्त करतो व आपणास पुढील संघटनात्मक कार्यास शुभेच्छा देतो.
ओंकार गुंड यांना उत्तर आणि दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी आता एकत्रितपणे मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गुंड समर्थकांनी एकच जल्लोष केला. गुंड यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या संघटनात्मक कामाचा गौरव केला आहे.
यावेळी ओंकार गुंड म्हणाले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी म्हणून काम करत असताना पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती उत्तरेची जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे व कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलदादा गव्हाणे यांचा मनापासून आभारी आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तळागाळात पोहचवण्याचा व सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीन.