रायतळयात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री पारनेर/प्रतिनिधी : रायतळे गावामध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून गावचे आराध्य दैवत श्र...
रायतळयात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री
पारनेर/प्रतिनिधी :
रायतळे गावामध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला असून गावचे आराध्य दैवत श्री काळभैरवनाथ तसेच परिसरात हे व्यवसाय बिनदिक्तपणे सुरू असल्याबद्दल भाविकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुपे पोलिसांकडूनही या व्यवसायांकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
रायतळे गावामध्ये एकही अधिकृत दारू विक्रीचे दुकान नाही. सुपे येथून बेकायदेशिररित्या दारूची खरेदी करण्यात येऊन गावामध्ये त्याची विक्री केली जात असल्याची माहीती पुढे
आली आहे. दारूच्या व्यसनामुळे गावामध्ये अनेक कुटूंबांना त्याची किंमत मोजावी लागली असून असे व्यवसाय करणारांनी ते तात्काळ बंद केले तर येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार होतील याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. गावामध्ये विविध भागांतून भाविक येतात. मंदीर परिसरातील अशा उद्योगांमुळे काय संदेश जाईल याचीही काळजी घेतली जात नाही. अवैध व्यवसायासंदर्भात पोलिसांनीही खबरदारी घेऊन या व्यवसायांवर टाच आणली पाहिजे अशी अपेक्षा सामान्य नागरीकांना आहे.