बस नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान पारनेर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसने वेधले आगारप्रमुखांचे लक्ष पारनेर प्रतिनि...
बस नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
पारनेर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसने वेधले आगारप्रमुखांचे लक्ष
पारनेर प्रतिनिधी :
शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एसटी बस वेळेत येत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यासाठी तालुक्यातील विविध मार्गावरील एसटी बसचे वेळेचे नियोजन कॉलेजची वेळ लक्षात घेऊन त्यात बदल करावा, अशी मागणी आगारप्रमुख पराग भोपळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पारनेर तालुक्यातील एसटी बसेस सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते, त्यानंतर तालुक्यातील गावोगावी एसटी बसेस सुरू करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पारनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नेहमीच अग्रेसर असते. त्यात विद्यार्थ्यांचा अतिशय महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे एसटी बस, तालुक्यातील गांजी भोयरे - जवळा गुणीरे गाडीलगाव गोरेगाव पाडळी तर्फे पाडळी कान्हुर पा रनेर आळेफाटा या मार्गावरील एसटी बसेस योग्य वेळेवर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या तिनही मार्गावरील एसटी बसेसच्या वेळेत त्वरित बदल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस तुषार गाडेकर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत गोरडे, उपाध्यक्ष विकास गिरी तसेच विद्यार्थी मित्र साहिल खैरे, अभी थोरात, विराज पांढरे, अक्षय पांढरे यांनी पारनेर परिवहन आगारप्रमुख पराग भोपळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.