शिवबा संघटनेचे कार्य समाजशील : डॉ श्रीकांत पठारे शिवबा संघटना कार्यालयास सदिच्छ भेट. पारनेर/प्रतिनिधी : निघोज येथे सत्कार सभारंभासाठी आले...
शिवबा संघटनेचे कार्य समाजशील : डॉ श्रीकांत पठारे
शिवबा संघटना कार्यालयास सदिच्छ भेट.
पारनेर/प्रतिनिधी :
निघोज येथे सत्कार सभारंभासाठी आले असताना नवनियुक्त शिवसेना तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यानी शिवबा संघटना कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचवेळी पाणीवाटप संस्था च्या चेअरमन पदी किसन सुपेकर याची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संघटना करत असलेल्या कार्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिली. यावेळी संघटनेचे कार्य समाजशिल असल्याचे डॉ पठारे यांनी संगितले. व समाजकार्यास राजकीय जोड असल्यास कार्य प्रभावी होत असल्याचे सांगितले. डॉ. पठारे यांचा यावेळी वडनेर ग्रामस्थांच्यावतीने ही सत्कार करण्यात आला.
यावेळी किसन सुपेकर,पांडुरंग येवले,शिवाजी लाळगे,अमोल गाजरे,रमेश वाजे,बबन ससाणे,बाबाजी तनपुरे,खंडु लाळगे,सुदाम बाबर, सुरेश येवले,संदेश मुरकुटे,उत्कर्ष जगदाळे,मंगेश सालके,रामदास मेचे,भाऊसाहेब लामखडे,प्रशांत पठारे, आदि मान्यवर उपस्थित होते.