पारनेर राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंतांचा सन्मान सोहळा शनिवारी हिवरे बाजार येथे कार्यक्रम पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुका राज्य...
पारनेर राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंतांचा सन्मान सोहळा
शनिवारी हिवरे बाजार येथे कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक दृष्टिकोन ठेवून नेहमी विविध उपक्रम राबवले जात असतात. समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना नेहमी सन्मानित केले जाते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांच्या वतीने हिवरे बाजार या ठिकाणी विविध गुणवंतांचा सन्मान सोहळा २०२२ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम हिवरे बाजारचे मा. सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते हिवरेबाजार या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमासाठी राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विश्वासराव आरोटे सर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते हे प्रमुख उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण टिंग्या चित्रपट फेम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अभिनेते शरद गोयेकर, गाडी घुंगराची फेम गीतकार संगीतकार विलासराव अटक हे आहेत.
हा कार्यक्रम शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता हिवरेबाजार येथे होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान माजी सैनिक कॅप्टन विठ्ठल वराळ निघोज, दीपक निघुट वडझिरे, दगडू डेरे आळकुटी, राहुल गाडगे कळस, दिगंबर शेळके टाकळी ढोकेश्वर, संजय वाकचौरे गोरेगाव, गणपत कुटे ढवळपुरी, कृष्णाराव वाबळे वासुंदे, संजय शेलार जवळे, साहेबराव सोबले पारनेर, विश्वनाथ लामखडे राळेगण थेरपाळ, स्वाती कावरे पारनेर, यांना पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच सर्पमित्र गणेश आल्हाट टाकळी ढोकेश्वर तुषार मोरे वडझिरे यांना पारनेर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती पारनेर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता घाडगे सर व उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी दिली.