सुपा एमआयडीसीत कोणाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर उत्खनन ? थेट महसुल मंत्री विखे यांना निवेदन; कारवाई होणार का ? पारनेर/प्रतिनिधी : पारनेर ता...
सुपा एमआयडीसीत कोणाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर उत्खनन ?
थेट महसुल मंत्री विखे यांना निवेदन; कारवाई होणार का ?
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा म्हसणे फाटा परीसरातील नव्या औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीररित्या उत्खनन केल्या बाबत महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाघुंडे बुद्रुक येथील अनिल दिवटे यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हणले आहे की, नव्या औद्योगिक वसाहती तील अंबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बेकायदेशीररित्या उत्खनन केलेले आहे. सदर कंपनी मध्ये जे खडी, वाळु, मुरूम हे खनिज वापरले गेले आहे. याची शासनाकडे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही.
त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर कंपनी बाबत स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण देखील केलेले आहे पंरतु त्याची देखील कुठल्याही अधिकाऱ्या नी आजतागायत दखल घेतलेली नाही तसेच महसुल अधिकाऱ्यांनी देखील दखल घेतली नाही. महसुल अधिकाऱ्यांनी सदर बेकायदेशीर उत्खननांचा पंचनामा केलेला आहे. पंरतु कुठलीही कारवाई सदर कंपनीवर करण्यात आलेली नाही. या बाबतीत कुठलीच कारवाई न झाल्याने सदर प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येते. याकरता आपण लक्ष घालुन योग्य ती कारवाई करावी. आपणही याबाबत दखल न घेतल्यास आम्ही आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करू याची नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.