सेनेचे आणखी दोन पदाधिकारी शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर : विकास रोहोकले पारनेरमध्ये स्थानिक नेतृत्वावर नाराजी पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील ...
सेनेचे आणखी दोन पदाधिकारी शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर : विकास रोहोकले
पारनेरमध्ये स्थानिक नेतृत्वावर नाराजी
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व त्यांच्या बोलण्यातून अनेकांना नाराज करत असून, त्यामुळे सेनेचे आणखीन दोन पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. यामुळे सेनेला पारनेर तालुक्यात खिंडार पडणार असल्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी सांगितले. यामुळे शिंदे गटाला सेनेचे कोणते पदाधिकारी गळाला लागले आहेत.
याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे यांनी विकास रोहोकले यांची शिंदे गटाच्या पारनेर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली.
ठाकरे गटाने पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांची तातडीने नियुक्ती केली. दरम्यान, शिंदे गटातून तालुकाप्रमुख झाल्यावर विकास रोहोकले यांनी शिंदे गट बांधणीला सुरुवात केली आहे. त्यातून त्यांनी पहिल्या टप्प्यात स्वतःचा ढवळपुरी जिल्हा परिषद गट भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत.
त्यातील अनेक शिवसैनिक त्यांनी जोडले आहेत.
विकास रोहोकले यांना पुन्हा 'मातोश्री'चे निमंत्रण
शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात सामील झाल्यानंतर 'मातोश्री वरून रोहोकले यांना शिवसेनेनेतच थांबण्याची साद घालण्यात आली. मात्र, स्थानिक शिवसेना नेतृत्व व्यवस्थित वागणूक, अधिकार देत नसल्याने आपण शिदे गटाकडे जाणार असल्याचे रोहोकले यांनी मातोश्री हून संपर्क केलेल्यांना सांगितले.
पारनेर तालुक्यात शिवसेनेचे स्थानिक नेतृत्वावर शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी यांची नाराजी आहेत. त्यामुळे माझ्याबरोबर शिंदे गटात ५ सप्टेंबरला काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत
-विकास रोहोकले, शिवसेना तालुकाप्रमुख, पारनेर शिंदे गट.