📌 सरपंच ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम 📌 प्रसिद्ध गायिका कोमल पाटोळे यांचा वनकुट्यामध्ये आवाज घुमणार 📌 आमदा...
📌 सरपंच ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
📌 प्रसिद्ध गायिका कोमल पाटोळे यांचा वनकुट्यामध्ये आवाज घुमणार
📌 आमदार निलेश लंके यांची उपस्थिती
पारनेर प्रतिनिधी
वनकुटे येथे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून दररोज विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी प्रसिध्द कलाकार कोमल पाटोळे यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती उपसरपंच अर्जुन उर्फ बंडू कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान, लोकनियुक्त सरपंच अॅड. राहूल झावरे यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. आ. नीलेश लंके यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोमलताईंचा आवाज घुमणार वनकुट्यात..
सुसंस्कृत आणि प्रसिद्ध गायिका म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्रात आहे अशा कोमलताई पाटोळे यांचा सांस्कृतिक गाण्याचा कार्यक्रम सरपंच ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त वनकुटे येथे होत आहे. त्यामुळे कोमल ताईंचा आवाज आता वनकुट्यात घुमणार कोमलताई पाटोळे या पहिल्यांदाच आपल्या परिसरात येत असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या कोमल पाटोळे यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे सोमवार दि. ५ सप्टेबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता पार पडणाऱ्या या कार्यक्रमास आमदार नीलेश लंके हे उपस्थित राहणार असून यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच अँड. राहूल झावरे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान वनकुटे गावचे लोकनियुक्त सरपंच ऍड. राहुल झावरे यांचा वाढदिवस वनकुटे येथे विविध सामाजिक उपक्रम राबवित यावेळी साजरा करण्यात येणार आहे या दरम्यान अभिष्टचिंतन सोहळ्याचे ही आयोजन केले आहे.
..