शहाजीबापू पाटलांचे सुजित पाटलांनी केले तालुक्यात स्वागत पारनेर येथील देवकृपा फाउंडेशनच्या ऑफिसला भेट पारनेर प्रतिनिधी : सांगोला मतदारसंघाच...
शहाजीबापू पाटलांचे सुजित पाटलांनी केले तालुक्यात स्वागत
पारनेर येथील देवकृपा फाउंडेशनच्या ऑफिसला भेट
पारनेर प्रतिनिधी :
सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील पारनेर तालुक्यामध्ये एका व्यवसायाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांचे भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा पारनेर येथे सत्कार करत जोरदार स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाचे शहाजीबापू पाटील हे एक आमदार आहेत काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील..समदं ओके..हा त्यांचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला त्यामुळे शहाजीबापू पाटील हे चांगलेच चर्चेत आले. सध्या त्यांच्या या डायलॉगची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शहाजी बापू चांगले चर्चेत आहेत पारनेर तालुक्यात एका हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी शहाजी बापू पाटील यांनी पहिल्यांदाच हजेरी लावली यावेळी पारनेर तालुक्यात त्यांचे सुजित झावरे पाटील व समर्थक तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.
यावेळी सुजित पाटील व आमदार शहाजी बापू पाटलांनी विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी पारनेर बाजार समितीचे मा. सभापती बापूसाहेब भापकर, अरुणराव ठाणगे, युवा नेते रवींद्र पडळकर, चंद्रकांत कुलकर्णी आदी सुजित झावरे पाटील समर्थक व भाजप कार्यकर्ते व देवकृपा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.