निघोज गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर पारनेर/प्रतिनिधी : निघोज गावचे कार्यक्षम उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांन...
निघोज गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
पारनेर/प्रतिनिधी :
निघोज गावचे कार्यक्षम उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्कार जाहीर झाला.
ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नेहमी गौरव केला जातो. पारनेर तालुक्यातील निघोज सारख्या एका मोठ्या बाजारपेठेच्या गावचे उपसरपंच पद ज्ञानेश्वर वरखडे हे सध्या संभाळत आहेत अतिशय आक्रमक व सर्वसामान्यांच्या हितासाठी ते काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी हा पुरस्कार जाहीर केला ४ सप्टेंबर रविवारी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान ज्ञानेश्वर वरखडे यांच्या मातोश्री मिराताई वरखडे या पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका असून वरखडे कुटुंब निघोज व तालुक्यात राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्या कुटुंबाचा वारसाच आता ज्ञानेश्वर वरखडे हे चालवत आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना युवकांचे मोठे संघटन निघोज परिसरामध्ये त्यांच्यासोबत आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे यांना मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक राजकीय कामाचा गौरव आहे. कमी वयामध्ये निघोज गावचे उपसरपंच पद मिळाल्यानंतर गावच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून देत काम करत आहेत. निघोज गावचे स्व. संदीप पाटील वराळ यांना ते आपले आदर्श मानतात उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे हे काम करत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ज्ञानेश्वर वरखडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, निघोज गावच्या सरपंच चित्राताई वराळ यांनी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत व पुढील कार्यासही शुभेच्छा दिल्या.