वेब टीम : अहमदाबाद गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळून आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी ...
वेब टीम : अहमदाबाद
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळून आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने मोरबी येथे पोहचले त्यांनी घटनेची माहिती घेतली.
या दुर्घटनेत आतापर्यंत१५० जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली. 6.45 पर्यंत बचावकार्याला सुरूवात झाली होती.
काही तासातच विविध दलाच्या 200 हून अधिक लोकांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन केले. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली.
माहितीनुसार, मोरबी येथील माचू नदीवरील शंभर वर्षे जुना पूल रविवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास कोसळला.
यावेळी पुलावर उपस्थित असलेले पर्यटक नदीत कोसळले. नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अद्यापही हे बचावकार्य सुरु आहे.