वेब टीम : मुंबई राज्यात अफवांचे पीक चालू झाले आहे. तुमचे अडीच वर्षांचे काम आणि आमची ९० दिवसांची तुलना करून तुम्ही वरचढ ठरले तर ह...
वेब टीम : मुंबई
राज्यात अफवांचे पीक चालू झाले आहे. तुमचे अडीच वर्षांचे काम आणि आमची ९० दिवसांची तुलना करून तुम्ही वरचढ ठरले तर हे सरकार खुर्ची खाली करेल, असे आव्हानही गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
काही लोक आम्हाला बदनाम करण्याचे काम करत आहेत. परंतु आम्ही त्यांना कामांतून उत्तर देणार, असेही ते म्हणाले. कर्नाटकमध्ये पैसे मिळेल त्यासाठी गाडी आणली होती. मग आमच्या ५० खोक्यांसाठी कोणता ट्रक आणला होता? असेही पाटील यांनी विचारले आहे.
एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. तुमच्या वादामुळे ४० आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे. राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनाही रवी राणा यांना आवर घालण्याची त्यांनी मागणी केली. ४० वर्षांचे करिअर डावाला लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राणांना आवर घालावा, असे ते फडणवीस यांना म्हणाले.