वेब टीम : मुंबई बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या पहिल्या...
वेब टीम : मुंबई
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या पहिल्या चित्रपटाला यश मिळाल्याने चाहते दुसऱ्या चित्रपटाचीही वाट पाहत आहेत.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. आता चित्रपटाची वाटचाल चित्रपटगृहांच्या दिशेने सुरू आहे.
दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. आतापर्यंत निर्मात्यांनी प्रत्येक पात्राचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. लीड स्टार अजय देवगणचे लेटेस्ट पोस्टर रिलीज झाले आहे.
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुपरस्टार अजय देवगण हातात फावडे धरून एका बाजूला बघताना दिसत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करताना अजय देवगणने कॅप्शन दिले, ‘प्रश्न हा नाही की तुमच्या डोळ्यासमोर काय आहे. आपण काय पहात आहात हा प्रश्न आहे.’
या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. मेकर्स दृष्यम २ चा ट्रेलर पुढच्या आठवड्यात रिलीज करतील. या चित्रपटाच्या ट्रेलरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.