वेब टीम : झारखंड झारखंडच्या लातेहारमध्ये शुक्रवारी सायंकाळी उशिरा एका अल्पवयीन मुलीवर 10 मद्यधुंद अल्पवयीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याच...
वेब टीम : झारखंड
झारखंडच्या लातेहारमध्ये शुक्रवारी सायंकाळी उशिरा एका अल्पवयीन मुलीवर 10 मद्यधुंद अल्पवयीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी सर्व 10 आरोपींना अटक केली असली तरी पीडित मुलीवर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही अल्पवयीन मुलगी एका अल्पवयीन मुलासह लातेहार पोलीस स्टेशन परिसरात ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेली होती.
दोघे घरी परतत असताना रेल्वे स्थानकावर थांबले होते, तेव्हा सूत्रांच्या माहितीनुसार दारूच्या नशेत असलेल्या 10 आरोपींनी मुलीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
तिच्यासोबत असलेल्या तरुणांनी विरोध केल्यावर त्याला टोळक्याने बेदम मारहाण केली आणि जीव वाचवण्यासाठी त्याला घटनास्थळावरून पळून जावे लागले. यानंतर आरोपी गटाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तपासानंतरच घटनेची सविस्तर माहिती दिली जाईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.