वेब टीम : मुंबई राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज यांनी मनसे पदाधिकार्यांची बैठक काल बोलाविली होती. रंगशारदा ये...
वेब टीम : मुंबई
राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज यांनी मनसे पदाधिकार्यांची बैठक काल बोलाविली होती. रंगशारदा येथील बैठकीत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
आगामी महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचे संकेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढचे पाच महिने दिवस-रात्र काम केले पाहिजे. तुम्हाला विजयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. मी तुम्हाला विधानसभेतही सत्तेत घेऊन जाईन.
लोकसभेतही आपले खासदार बसवेन. तुम्हालाच खुर्चीवर बसवेन, मी मात्र खुर्चीवर बसणार नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
राज्यातील राजकारण खालच्या थराला गेले आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचे म्हटले जाते; पण, ही कसली सहानुभूती, यांनी तर जनतेशी प्रतारणा केली आहे. आपल्याला पुढच्या प्रत्येक निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळवायचे आहे, असेही राज म्हणाले.