अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 92 वर्षा...
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 92 वर्षाच्या आजीबाई हसीनाबी मोहम्मद सय्यद यांना नवदृष्टी मिळाली असून, त्यांना स्पष्ट दिसू लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
शहरात एकीकडे जातीपातीचे राजकरण, मोर्चे व आंदोलन होत असताना माणुसकीच्या भावनेतून या आजीबाईला मिळालेली नवदृष्टी सर्वांनाच भावली.
नागरदेवळे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. एक डोळा काचबिंदू, मधुमेह व उच्च रक्तदाबाने गमावलेल्या कोठला येथील हसीनाबी यांना दुसर्या डोळ्याने देखील दिसत नसल्याने त्या मोठ्या आशेने शिबिरात दाखल झाल्या. त्यांच्या डोळ्यातील पडद्याला छिंद्र असल्याचे यावेळी निदान झाले. त्यांचे वय व प्रकृतीमुळे ही अवघड शस्त्रक्रिया करणे अवघड गोष्ट होती. मात्र फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी पुणे येथील तज्ञ डॉ. रितेश शहा यांच्याशी संपर्क करुन परिस्थिती सांगितली व डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली.
डॉ. शहा यांनी पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये हसीनाबी यांच्यावर अतिशय अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्या शस्त्रक्रिया होवून शहरात परतले असता, त्यांनी जालिंदर बोरुडे यांना जवळ घेऊन नवदृष्टी पहाता आली असल्याची प्रतिक्रिया देऊन त्यांना भरभरुन आशिर्वाद दिला. या शिबिरात इतर ज्येष्ठ नागरिकांवर देखील मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ते देखील शहरात परतले आहेत.