अहमदनगर (प्रतिनिधी)- थंडी निमित्त शहराचे तापमान गारठत असताना अंध,अपंग, निराधार व वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात...
अहमदनगर (प्रतिनिधी)- थंडी निमित्त शहराचे तापमान गारठत असताना अंध,अपंग, निराधार व वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
शहरांमध्ये अंध,अपंग,निराधार व वंचित घटकातील अनेक ज्येष्ठ नागरिक उघड्यावर झोपून आपले जीवन जगत आहेत वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत आहे. उघड्यावर झोपणारयांचे जीवन चांगले होण्यासाठी अँटी करप्शन कमिशनर संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नाजीम कुरेशी यांच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
यावेळी नदीम सय्यद, कैसर सय्यद, पापा बागवान, अक्षय शिरसाट, मोहम्मद अली पार्टी, गुड्डू भाई, अल्ताफ सय्यद, राजू मदारी, समद सहाब, नवेद सर, नदीम सय्यद समीर शेख सामाजिक कार्यकर्ते मुक्तार मणियार काँग्रेसचे शहर चिटणीस नाझीम कुरेशी आदीसह हाजी मस्तान सेना अहमदनगर शहरचे अधिकारी उपस्थित होते.