मुंबई : वेब टीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री य...
मुंबई : वेब टीम
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला.
शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. आणि उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र आहेत. म्हणून शेर का बेटा शेर होता असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना शेर म्हणून संबोधले आहे. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून देईल असेही ते म्हणाले आहेत.
देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि हे नाते आता आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे केजरीवाल यांनी भेटीनंतर सांगितले.
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, गुंडीगर्दी करण्याशिवाय भाजपला काहीच काम येत नाही. आम्ही आपल्यातच का लढत आहोत, असा प्रश्न सध्या मला पडत आहे.
दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणूकीत आम्हाला बहुमत मिळून देखील आमचा महापौर भाजप बनू देत नव्हते, परिणामी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. आणि शेवटी आमचाच महापौर नियुक्त झाला.
केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले. आणि आम्ही कोरोना काळात महाराष्ट्राकडून अनेक गोष्टी देखील शिकलो.