अहमदनगर दि. 8 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक व मराठा विद्याप्र...
अहमदनगर दि. 8 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक व मराठा विद्याप्रसारक समाज संचलित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक,अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्हयातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजता पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, उदोजी मराठा बोर्डींग कॅम्पस, गंगापुररोड, नाशिक येथे करण्यात आले असुन इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील ४५-५० नामांकित कंपन्याचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. इच्छुक आयटीआय (सर्व ट्रेड) व इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नांव नोदणी करून पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, उदोजी मराठा बोर्डींग कॅम्पस, गंगापुररोड, नाशिक येथे रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
COMMENTS