वेब टीम अहमदनगर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे प्रश्नांसर्भात वेळेावेळी आंदालेन केलेले...
वेब टीम अहमदनगर
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे प्रश्नांसर्भात वेळेावेळी आंदालेन केलेले असून सरकार सोबत बैठका होऊन चर्चा केलेली आहे. परंतु आज अखेर जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसह लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे वेतन त्रुटीचे व इतर प्रश्न सुटलेले नाहीत. सर्व मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा महाराष्ट्रातील सर्व लिपीकवर्गीय कर्मचा-यांनी दि. 14 मार्चपासून पासुन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव अरूण जोर्वेकर यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, लिपिक वर्गीय कर्मचा-यांचे समान काम, समान वेतन आणि समान पदोन्नती टप्पे यासाठी समिती गठित करण्यात आलेली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागास तसा अहवाल समितीने दिला व त्यानुसार त्यांनी दिनांक 23 मे 2022 रोजी शासन परिपत्रकानुसार सर्व विभागातील लिपिक वर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत दिनांक 31ऑगस्ट 2022 अखेर तसे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेशित केले होते. परंतु त्याप्रमाणे आज अखेर कार्यावाही झाली नाही. तरी या विषयावर तात्काळ निर्णण घेण्यात यावा. नविन पेन्शन योजना (एन पी एस ) बंद करुन जुनी पेन्शन योजना सुरु करावी,
जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे ग्रेड पे आणि सातवे वेतन आयोगातील त्रुटी दुर करणे, समान काम समान पदोन्नतीचे टप्पे या धर्तीवर लिपीकांचे पदोन्नतीचे स्तरामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, जिल्हापरिषद लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण रदद करणे, सुधारीत आकृती बंदामध्ये लिपीकांची पदे वाढविणे बाबत, जिल्हापरिषद कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांप्रमाणे गृहबांधणी व मोटारसायकल अग्रीम मिळावे, .सहावे वेतन आयोगाचे हप्ते आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
वरील प्रश्नाची नोटीस शासनाला दिलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपीकांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे . महाराष्ट्रातील सर्व जिल्हापरिषदा आणि पंचायत समिती दिनांक 14 मार्च 2023 बद रहाणार आहे.याची सर्व जबाबदारी शासनावर रहाणार आहे.
अहमदनगर जिल्हयातील सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी हे जोपर्यत जुनी पेन्शन योजना लागु करत नाही तोपर्यत बेमुद संपावर जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते कल्याण मुटकुळे यांनी दिली.
शासनाने तातडीने लिपीकवर्गीय कर्मचा-यांचे मागण्यावंर विचार करुन संपात जाण्यास भाग पाडु नये अशी मागणी जिल्हाध्यक्ष कैलास डावरे, कोषाध्यक्ष भरत घुगे, सचिव विकी दिवे कार्याध्यक्ष गणेश तोटे,रामदास मिसाळ , सुधीर खेडकर , संदीप अकोलकर , संदीप मुखेकर , दिपक जोशी , स्वाती पिचड , शांताराम आव्हाड , धैर्यशंभो सोलट , संतोष खैरनार , विशाल परदेशी आदींनी केली आहे.