पुणे, 9. 03. 23 : इन्फिनाईट व्हेरिएबल व श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मा...
पुणे, 9. 03. 23 : इन्फिनाईट व्हेरिएबल व श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान ‘ती’ च्या कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
इन्फिनाईट व्हेरिएबलच्या संचालिका वृषाली फडणवीस आणि सामाजिक कार्यकर्त्या रुपाली मगर यांच्या हस्ते सन्मानार्थी महिलांचा सत्कार करण्यात आला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली ओळख निर्माण करत आहेत. महिलांच्या कार्याचे कौतुक फक्त एक दिवसापुरतेच नसावे तर वर्षभर तिच्या कार्याचे महत्त्व असावे, असे मत इन्फिनाईट व्हेरिएबलच्या संचालिका वृषाली फडणवीस यांनी व्यक्त केले. एक महिलेने दुसऱ्या महिलेला नेहेमी सहकार्य करावे तसेच प्रत्येक कामात प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली मगर यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी पर्यावरणप्रेमी पुष्पा नवले, सफाई कर्मचारी दिपाली सूर्यवंशी, सफाई कर्मचारी सुनिता यादव, अंगणवाडी सेविका संगीता वांद्रे, शाहू लक्ष्मी कला क्रिडा ॲकडमीच्या संचालक अध्यक्षा अनुराधा एडके, परिचारिका मेघा वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक सरला दसगुडे, कुं. स. म पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सविता कुंभार या कर्तुत्वान महिलांना शाल, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप देवून गौरविण्यात आले. इतर उपस्थित महिलांना शाल व तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी इन्फिनाईट व्हेरिएबलचे संचालक अर्णव फडणवीस, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, ओंकार मित्र मंडळाचे वैभव दिघे, मंडळाचे कार्यकर्ते राहुल मारणे आदी उपस्थित होते. इन्फिनाईट व्हेरिएबलच्या सदस्या स्वामीनी पंडित आणि प्रतीक्षा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
COMMENTS