चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, वरोरा ठिकाणी शिवगर्जना मोहिमेदरम्यान जाहीर सभा चंद्रपूर : केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने गेली अने...
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, वरोरा ठिकाणी शिवगर्जना मोहिमेदरम्यान जाहीर सभा
चंद्रपूर : केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने गेली अनेक वर्षांत स्वतंत्र विदर्भाच्या नावाखाली जनतेला फसवले आहे. या मुद्द्यावर राज्यात आणि केंद्रात मतदान करून घेतले. मात्र ना विकासकामे केली, ना लोकांची सेवा. त्यामुळे आता राज्यातील जनतेचा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बसला आहे. त्यामुळे मूलभूत विकास कामासाठी आगामी निवडणुकीत विदर्भातील जनतेचा कौल बदलणार आहे. जनता भूलथापांना कंटाळली असल्याने आता विदर्भातील शिवसेना मोठी झेप घेईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, वरोरा ठिकाणी शिवगर्जना मोहिमेदरम्यान जाहीर सभा घेण्यात आल्या असून, मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान विदर्भात शिवगर्जना मेळावा घेण्यात येत आहे. नागपूरनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम आदी ठिकाणी ते जाणार आहे. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम, प्रकाश मारावार, युवासेना विस्तारक शरद कोळी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे, पूर्व विदर्भ शिवसेना प्रवक्त्या शिल्पा बोडखे, सुरेश साखरे, बबन उरफूडे, वासुदेव चापके, महिला आघाडीच्या उज्वला नलगे, कल्पना गोरधाटे, सरिता कुडे, कुसुम उदार, ज्योरी नाडे, सागर ठाकूरवाड, सूरज मधुरवाड, डॉ. गोपाळसिंह बछिरे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, विभागप्रमुख सोपान बांगर , प्रशांत डिघुळे, विलास शिंदे आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.