अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका न...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी मंगळवारी (दि.14 मार्च) नवीन जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी 10:30 वाजता एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपात जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद व त्यांच्या संलग्न सर्व संघटना, महानगरपालिका, पंचायत कर्मचारी, जुनी पेन्शन हक्क संघटना आदी सर्व संघटना सामील होणार आहेत. या आंदोलनात सहभागी होऊन न्याय, हक्काच्या मागण्यांसाठी शासनाला जागे करण्याचे काम सर्व कर्मचारी बांधव करणार आहेत.
जिल्हा पातळीवर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया समोर तर तालुका पातळीवरील आंदोलन तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन होणार आहे. संप यशस्वी होणार असून, कर्मचारी, शिक्षकांनी कोणत्याही घोषणा व अफवांना बळी न पडता संपात उतरण्याचे समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.